श्रीक्षेत्र जेजुरी, बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामी खंडेरायाची नगरी

आरती-भूपाळी

रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्याकाळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याला भूप रागामध्ये पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून जगविले जाते त्याला भूपाळी असे म्हणतात.पेशवाई मध्ये नामांकित कवींनी रचलेल्या रचना प्रसिद्धच आहेत त्यापैकीच "घनश्याम सुंदरा..." हि होनाजी बाळाची भूपाळी सर्वांनाच माहित आहे त्यांचेच समकालीन शाहीर सगनभाऊ यांनी रचलेले पद आजही खंडोबा मंदिरामध्ये भूपाळीच्या आरंभीच म्हंटले जाते.
श्रीक्षेत्र जेजुरी येथील मंदिरांमध्ये रोज पहाटे भूपाळी म्हंटली जाते,या भूपाळीतील पदे वेगवेगळ्या कालावधीत( १८व्या / १९व्या शतकात ) वेगवेगळ्या कवींनी (सगनभाऊ, बापू वाघ्या, रामभाऊ, हरिभाऊ, नामा परीट इ.) रचलेली आहेत परंतु ती कुठेही लिखित स्वरुपात नसल्याने ज्यांना ती मुखोदगत आहेत त्यांच्याकडूनच ती ऐकायला मिळते. खास www.jejuri.in संकेतस्थळावर प्रथमच संकलित करून प्रसिद्ध करण्यात येत आहे.