भोसले घराणे
वेरूळ गावचे पाटील असलेले भोसले घराणे मालोजी राजे भोसल्यांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले.तेव्हा पासून क-हेपठारच आणि भोसल्यांच अतूट नाते आहे. जेजुरी व श्रीखंडोबा संदर्भात उपलब्ध कागदपत्रांवरून भोसले घराण्याचा घेतलेला धावता आढावा........
शहाजीराजे भोसले
मालोजीराजांची पुणे व सुपे परगण्याची जहागिरी त्यांच्या मृत्यू नंतर वयाच्या पाचव्या वर्षी शहाजी राजांना मिळाली व आपले काका विठोजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कारकीर्द फुलू लागली. पुढील काळामध्ये पराक्रमी शहाजीराजांनी निजामशाही किंवा आदिलशाहीमध्ये स्वकर्तुत्वावर जहागिरी मिळवली व टिकवली होती सुपे परगण्याची जहागिरी बहुतांश काळ त्यांचेकडेच असल्याने क-हेपठारावर त्यांचा नेहमीच वावर होता. जिजाऊ मासाहेब व शिवराय यांचेकडे पुणे प्रांतातील कारभार सोपविल्यानंतर त्यंचा मुक्काम अखेर पर्यंत बंगरूळलाच
होता.'चिटणीसाची बखर' मधील वर्णनानुसार शिवाजी महाराजांची व शहाजी राजांची ऐतिहासिक भेट जेजुरगडावर झाली होती. याभेटीचे वर्णन करताना बखरकार म्हणतो ही भेट ब-याच कालावधीनंतर होत असल्याने प्रत्यक्ष समोरासमोर उरभेट होण्यापूर्वी कास्याच्या परातीमधील तुपामध्ये मुखदर्शन घेऊन मगच प्रत्यक्ष भेट घेतली. या ऐतिहासिक भेटीचे समूहशिल्प जेजुरगडावर नव्याने उभे रहात आहे.
अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.jejuri.in
आपल्या प्रतिक्रिया व सूचना जरूर कळवा....
राजमाता जिजाऊ
शहाजीराजांच्या जहागिरीमध्ये जिजाऊ मातुश्री पुण्यामधून कारभार करीत होत्या महसूल वसुली बरोबरच अनेक न्याय निवाडे करणे अशी महत्वपूर्ण कामे त्या करीत असत.ईसवी सन १६५२ पूर्वी श्रीखंडोबा देवाचे पुजारी सेवक हक्कदार गुरव व घडशी समाज यांचेमध्ये उत्पन्नामुळे तंटा निर्माण झाला होता तो तंटा विकोपास गेल्यानंतर पुण्यामध्ये मातुश्री जिजाऊसाहेब यांचेपुढे भांडण सोडविण्यासाठी अर्ज करण्यात आला. मासाहेबांनी न्यायनिवडा करून सर्व संमत असा निकाल दिला. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी असा कौलनामा दिला होता.
अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.jejuri.in
आपल्या प्रतिक्रिया व सूचना जरूर कळवा....
छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी महारजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तोरणा स्वराज्यात सामील करून घेतला तो विनासायास, ही बातमी विजापूरला आदिलशाही दरबारामध्ये समजली.शहाजी पुत्र शिवा बंडावा करतोय म्हणून त्याचा पुरता बिमोड करण्यासाठी शूर सरदार फत्तेखानाला फौज घेऊन पाठविले व या शूर सरदाराने सन १६४९च्या ऑंगस्ट मध्ये आपला डेरा क-हेपठारावर जेजुरी नजीक बेलसर खळदच्या शिवारामध्ये टाकला. नीरथडी वरील सुभानमंगळचा फडशा मराठा सरदार कावजीने पाडला ती स्वराज्यासाठीची पहिली लढाई आणि दुस-याच दिवशी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी फत्तेखानाच्या छावणीवर छापा टाकला आणि आदिलशाही फौजेला पळता भुई थोडी केली. ही लढाई म्हणजे गनिमी काव्याचा पहिला वहिला अध्याय, आणि महाराजांची तलवार शत्रूच्या रक्तात प्रथमच न्हाली ती येथे, इतका मोठा इतिहास या भूमीला आहे.
जेजुरी मंदिर संदर्भातील महाराजांचा एक कौलनामा प्रसिद्ध आहे. जिजाऊ मासाहेबांनी मंदिर उत्पन्नाबाबत दिलेला निवडाच कायम ठेवावा असे त्या कौलनाम्यात उल्लेखले आहे. तो कौलनामा.....शके १५७५ आषाढ वद्य १४
ईसवी सन १६५३ जुलै १३
कौलनामा प्रतीच्चंद्र मु व सी
अजर रा. सिवाजी राजे ---- गुरव पुजारा श्रीमार्तंड भैरव जेजुरी
गुरवातील मिरासीचा गसगसा होता त्याचा निवडा मातुश्री साहेबी करून सालसा करणे कौल दिधला आहे तेनेप्रमाणे साहेबांचाही कौल असे ......
रा येसाजी सर खवास.
अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.jejuri.in
आपल्या प्रतिक्रिया व सूचना जरूर कळवा....